सेवा संकल्प’ अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचा उपक्रम
मंडणगड (प्रतिनिधी):
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प’ अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने डेरवण येथील भ.क.ल. वालावलकर रुग्णालय, रोग निदान व संशोधन केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
यावेळी रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन रुग्णांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. तसेच रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. आजारपणाच्या काळात रुग्णांना मानसिक आधार मिळावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
“रुग्णांची सेवा हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. समाजातील गरजू आणि रुग्णांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देणे, हीच खरी समाजसेवा आहे,” अशी भावना भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते व जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी व्यक्त केली.
या उपक्रमावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर, चिपळूण ग्रामीण तालुकाध्यक्ष उदय घाग, चिपळूण तालुका ग्रामीण महिला अध्यक्षा वैष्णवी राजे-शिर्के, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश घाग, बूथ अध्यक्ष गणपत राणीम, दीपक मोहिते तसेच वालावलकर रुग्णालयातील सचिन धुमाळ, संकेत जांभळे, संदीप पाटील, ऋषिकेश शिवगण, दीपा गवस, सुरज पवार, अमित वैद्य, संतोष जाधव, स्वप्निल ठाकरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.












