आचरा पोलीस अधिकारी संजय कातिवले यांची मिराशी ब्राह्मण देवस्थळाला सदिच्छा भेट

आचरा, -अर्जुन बापर्डेकर

 

गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थे सोबतच उद्भवणाऱ्या वाहतूक समस्येचे निराकरण करण्यात व्यस्त असतानाही आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी आचरा येथील मिराशी ब्राह्मण देवस्थळाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे आचरा पीपल्स असोसिएशनचे चेअरमन व इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे चे अध्यक्ष प्रदीप गोपाळराव प्रभू मिराशी व राजेश मिराशी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत

आचरा उपसरपंच संतोष मिराशी, सलील मिराशी, राकेश मिराशी, राजेश मिराशी ,ऋषिकेश मिराशी, रुपेश मिराशी, कृषाकं मिराशी, विजय मिराशी व रुद्र मिराशी

आदी उपस्थित होते.