युवासेना देवरूख शहराच्या वतीने अनाथ आश्रम व साहस संस्थेत दिवाळी फराळ वाटप

युवासेना देवरूख शहरप्रमुख अर्जुन राजेंद्र रेवणे यांचा पुढाकार

देवरूख (प्रतिनिधी):

दिवाळीचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर फुलावा आणि सणाचा गोडवा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या सामाजिक भावनेतून युवासेना देवरुख शहराच्या वतीने देवरुख येथील अनाथ आश्रम,‌ गोकुळ बालिकाश्रम तसेच साहस संस्था येथे दिव्यांग मुलांना दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

हा सामाजिक उपक्रम महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत, युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य अपूर्वा सामंत आणि युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यावेळी संस्थेतील मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिवाळीचा आनंद सर्वांसोबत वाटून घेण्याच्या उद्देशाने युवासेनेच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, देवरुख नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष वैभव पवार, ज्येष्ठ शिवसैनिक राजू रेवणे, नगरसेवक दीपक गेल्ये तसेच रोशन रेवणे, सिद्धेश सुर्वे, नागेश कदम, उदय खांडेकर, ओंकार शिंदे, सिद्धू शेडगे, चिनू शिंदे, अमोल गायकर, शुभम केदारी आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू व विशेष मुलांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी आनंददायी ठरला. समाजसेवेचा वसा, जनसेवेचा ध्यास हा मुलमंत्र जपत अर्जुन रेवणे विविध उपक्रम राबवत आहेत