शिरगाव गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संजय रूपये

 

शिरगाव (प्रतिनिधी ):

देवगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव-शेवरेच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी संजय भिवा रूपये यांची बिनविरोध निवड झाली.

ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव-शेवरेची तहकूब ग्रामसभा नुकतीच ग्रामसचिवालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रशासक समीर शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची निवड करण्यात आली.

समितीच्या अध्यक्षपदी संजय रूपये, तर निमंत्रक म्हणून पोलिसपाटील आदित्य परब यांची बिनविरोध निवड झाली. संजय रूपये यांनी यापूर्वी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदही भूषविले आहे.