कुडाळ येथे गणरायाची विधिवत पूजा; जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
स्वप्निल कदम -कुडाळ :
कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे साकारलेल्या ‘सिंधुदुर्गच्या राजा’चे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची विधिवत पूजा करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसह सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.
‘हाकेला धावणारा, नवसाला पावणारा—सिंधुदुर्गचा राजा’ अशी भाविकांची श्रद्धा असून, गणरायाच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
यावेळी कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील, विनायक राणे, रेवती राणे, वैशाली पावसकर, मधुरा तुळसकर, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, चेतन पडते तसेच ‘सिंधुदुर्गचा राजा’ प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.












