…तोपर्यंत जिप पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. १ येथे मुलांना न पाठवण्याचा निर्णय
मालवण | प्रतिनिधी : रिक्त शिक्षक प्रश्नी संतप्त बनलेल्या पालकांनी जिप पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. १ येथे मुलांना न पाठवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करूनही रिक्त शिक्षक पद अर्थात कामगिरीवर अन्य शाळेत पाठवलेले शिक्षक दोन महिने उलटूनही पुन्हा शाळेत नियुक्त न झाल्याने पालकांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला.
ज्या वयात मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम होतो. त्या वयात मुलांना शाळेत पाठवूनही अपुऱ्या शिक्षकांअभावी योग्य शिक्षण मिळत नसेल तर उपयोगच काय? असा सवाल पालकांनी उपस्थित करत तात्काळ याप्रश्नी शिक्षण विभागाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली आहे. पालकांच्या मागणी नुसार शाळेत शिक्षक नियुक्त होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचे उपस्थित पालकांनी शिक्षण विभाग केंद्र प्रमुखांना सांगितले.
यावेळी जिप पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. १ अध्यक्ष निर्दोष रावजी साटम, उपाध्यक्ष सोनल सखाराम घाडीगांवकर, प्रविण चंद्रकांत साटम, जगदीश सखाराम घाडीगांवकर, दिपक सखाराम घाडीगांवकर, लक्ष्मण घाडीगांवकर, कपिल कदम व पालक वर्ग उपस्थित होते.
पहिली ते सातवी वर्ग असलेल्या या शाळेत सुमारे ५० विध्यार्थी आहेत. मात्र कामगिरीवर पाठवलेल्या शिक्षक प्रश्नामुळे रिक्त शिक्षक जागी जून महिन्यांपासून शाळेत हीच स्थिती कायम आहे. शिक्षण विभागाडे वारंवार निवेदन माध्यमातून लक्ष वेधुनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने शाळेत मुलांना न पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे पालकांनी स्पष्ट केले आहे. शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली आहे.











