रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील हिंदू कॉलनी आणि सुभाष रोड येथून तरुणाचे आणि विवाहितेचे अज्ञाताने अपहरण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटना रविवार 27 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 आणि सोमवार 28 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वा.सुमारास घडल्या आहेत.
याबाबत सुनंदा रमेश बजंत्री (35,मुळ रा.विजापूर,कर्नाटक सध्या रा.हिंदू कॉलनी,रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, त्यांचा मुलगा परशुराम रमेश बजंत्री (26) याला अज्ञाताने पळवून नेले. तर शिवाजी मोरस्कर (50,रा.सुभाष रोड श्रीराम टॉकिज समोर,रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, त्यांची पत्नी आरती शिवाजी मोरस्कर (43,रा.सुभाष रोड श्रीराम टॉकिज समोर,रत्नागिरी) हिला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. याप्ररकणी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 140(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












