सावंतवाडी : सावंतवाडी सहकारी पतपेढी मर्यादित, सावंतवाडी या संस्थेची १४ वी अधिमंडळ वार्षिक बैठक रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीराम वाचन मंदिर सभागृह, सावंतवाडी येथे संस्थाध्यक्ष श्री. रमेश भोंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी अध्यक्षांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करून अहवाल सालात दिवंगत झालेल्या मान्यवर, सभासदांचे नातेवाईक तसेच नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.
सभेच्या कामकाजात आर्थिक पत्रके व अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आर्थिक पत्रके मंजूर करण्यात आली. या सभेला संस्थेचे सुमारे ७५ सभासद उपस्थित होते.
सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून विशेष कार्यकारी अधिकारी श्री. संतोष उर्फ लक्ष्मण गावस उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सभासदांच्या पाल्यांपैकी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याबद्दल श्री. संतोष उर्फ लक्ष्मण गावस यांनी संस्थेचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे संचालक, कर्मचारी वर्ग, पीमी एजंट तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये बाळासाहेब बांदकर, नरेंद्र देशपांडे, अॅड. गोविंद बांदेकर, वासुदेव शिरोडकर, जयेश पोळके, जितेंद्र मोरजकर, महेश भाट आदींचा समावेश होता.
सभेच्या समारोपप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. उमाकांत वारंग यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषण केले. त्यानंतर सभेचे कामकाज पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले.












