खजिनदारपदी शैलेश मेस्त्री तर सचिवपदी दीपक केसरकर
सावंतवाडी:येथील प्रसिद्ध बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी यावर्षी सत्यवान बांदेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंडळाच्या खजिनदारपदी शैलेश मेस्त्री तर सचिवपदी दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संदर्भात मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज शुक्रवारी पार पडली. आगामी नवरात्रौत्सव सुरळीत आणि उत्साहात पार पाडण्याच्या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली व नवीन पदाधिकारी जाहीर करण्यात आले. निवडीची घोषणा होताच उपस्थित सर्व सदस्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना नूतन अध्यक्ष सत्यवान बांदेकर यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा केला जाईल. उत्सवाच्या काळात मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.













