तब्बल सात तास फोंडाघाट पेठेतील रस्ता एकेरी
फोंडाघाट : सेंट्रल एक्सल तुटल्याने भर बाजारात, टाटा कंपनीची नवी कोरी चेस असलेला (MH09HK7515) १६ चाकी सिग्ना ट्रक, रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली. अर्थात यामध्ये चालक सपोर्ट टीम येईपर्यंत हतबल होता. तरीही एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी त्यांनी सहकार्य केले. परिसरातील सर्व ट्रक चालकांनी तातडीने धाव घेऊन त्याला सहकार्य केले. आणि तब्बल सात तासांनी गाडीचा एक्सल बदलून गाडी मार्गस्थ झाली. दरम्यान कार्यरत असलेल्या कणकवली ट्राफिक पोलीस आणि चालकाची विनाकारण बाचाबाची झाल्याचे आणि स्थानिक चालकांनी समजावल्याचे समजते.वाहतूक खोळंब्यामुळे अखंड हरिनाम सप्ताह महोत्सवात सर्वांनाच त्रास सहन करावा लागला. सदर ट्रक जयगड वरून कोल्हापूरच्या दिशेने ३४ टन कोळसा भरून जात होता…..













