14 ते 19 वयोगटातील शालेय मुला मुलींचे दोन दिवस रंगणार सामने
चौके – प्रतिनिधी :-क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित मालवण तालुकास्तरीय खो खो स्पर्धा उद्या बुधवार दिनांक ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी चौके येथील भ.ता चव्हाण,महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके प्रशालेच्या मैदानावर घेण्यात येत आहे.
बुधवार दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजता चौके हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धांचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार असून त्यानंतर तालुक्यातील माध्यमिक शाळा मधील १४ ते १९ वयोगटातील मुलींचे सामने होणार आहेत. गुरुवार दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी १४ ते १९ वयोगटातील मुलांचे खो-खो चे सामने होणार आहेत.
यास संपूर्ण स्पर्धा क्रीडा समन्वयक मालवण संजय पेंडूरकर सर तसेच स्पर्धा संयोजक अनिल अचरेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध संपन्न होणार आहेत.













