मालवण ग्रामीण रुग्णालय येथील एक्स-रे मशीन सेवा पुन्हा सुरु 

नगराध्यक्षा ममता वराडकर यांचा यशस्वी पाठपुरावा

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नवी अत्याधुनिक एक्स-रे मशीन ही लवकरच उपलब्ध होणार 

मालवण | प्रतिनिधी : मालवण ग्रामीण रुग्णालय येथील एक्स-रे मशीन नादुरुस्त असल्याने काही दिवस बंद असलेली एक्स-रे मशीन सुविधा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या पाठपुराव्यातून पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नवीन अत्याधुनिक एक्स-रे मशीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरु असल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.

 

मालवण ग्रामीण रुग्णालय येथे असलेली एक्स-रे मशीन जीर्ण झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक्स-रे मशीन नादुरुस्त झाल्याने सेवा ठप्प झाली होती. नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे एक्स-रे मशीन सुविधा उपलब्ध करून घेतली आहे.

 

*लवकरच अत्याधुनिक एक्स-रे मशीन रुग्णांच्या सेवेत*

 

मालवण ग्रामीण रुग्णालय येथे एक्स-रे मशीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी या ठिकाणी असलेली जीर्ण एक्स-रे मशीन ची निर्लेखन व अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून नवीन अत्याधुनिक एक्स-रे मशीन रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्वच ठिकाणी गतिमान रित्या कामे सुरू आहेत. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या सेवेसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी सांगितले.