‘महात्मा गांधी नोबेल नॅशनल अवॉर्ड २०२६ मिळाल्याने दळवी यांच्या वर कौतुकाची थाप
वेंगुर्ले : दाजी नाईक
‘ग्लोबल पीस कौन्सिल’ आणि ‘इंटरनॅशनल ह्युमन राईट्स’ यांच्यातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांना प्रतिष्ठेचा “महात्मा गांधी नोबेल नॅशनल अवॉर्ड – २०२६” (Mahatma Gandhi Nobel National Award) मिळाल्याने आज बुधवारी वेंगुर्ले येथील कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते श्री. दळवी यांचा सन्मान करण्यात आला.
श्री. मनीष दळवी यांनी आजवर केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान देण्यात आला आहे. खासदार नारायण राणे यांनी दळवी यांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली. यावेळी त्यांच्यासोबत पद्मश्री परशुराम गंगावणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा तालुका अध्यक्ष पप्पू परब, आरोग्य शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.













