कणकवली :
वागदे येथील श्री आर्यादुर्गा मंदिरात रविवार, ११ ऑक्टोबरपासून मंगळवार, २० ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रम होणार असून भाविकांनी देवीच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दुर्गोपासक ऐक्यवर्धक संघाने केले आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी, रविवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता घटस्थापना, श्री देवीची महापूजा, चंडीपाठ व कुमारी पूजन होणार आहे. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान दररोज दुपारी १२ वाजता आरती, दुपारी ३ ते ३.३० या वेळेत पुराणवाचन (पु. वि. काजरेकर, जांभवडे) तसेच सायंकाळी ३.४५ ते ५.१५ या वेळेत सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून ह. भ. प. महेंद्र पंतमिराशी बुवा कीर्तनसेवा करणार आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त सायंकाळी ५.३० ते ७.३० सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून ७.३० ते ८.३० या वेळेत पालखी प्रदक्षिणा, आरती, मंत्रपुष्प असे कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम – रविवार दि. ११ ऑक्टोबर आदर्श संगीत विद्यालय, कणकवली प्रस्तुत सुगम संगीत मैफल, सोमवार दि. १२ ऑक्टोबर ‘भावगंध’ प्रस्तुत शास्त्रीय संगीत, अभंग, नाट्यगीत गायन, गायक प्रफुल्ल रेवंडकर.
मंगळवार दि. १३ ऑक्टोबर मुकुंदराव क्षीरसागर, जोधपूर यांचे गायन. बुधवार दि. १४ ऑक्टोबर सौ. मंजिरी धोपेश्वरकर, सावंतवाडी आणि सुरश्री प्रस्तुत अभंग-नाट्यगीत गायन.
गुरुवार दि. १५ ऑक्टोबर सायं. ५.३० ते ६.३० – विश्वास प्रभुदेसाई, किंजवडे यांचे भजन. सायं. ६.३० ते ७.३० – कथ्थक नृत्य : सौ. गिरीजा प्रभुदेसाई. शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर पं. जितेंद्र अभिषेकी यांना समर्पित मैफल ‘सूर चैतन्याचा’ सादरकर्ते मनोज मेस्त्री, कणकवली. शनिवार दि. १७ ऑक्टोबर संदेश खेडेकर, गोवा (पं. प्रभाकर कारेकर यांचे शिष्य) यांचे गायन. रविवार दि. १८ ऑक्टोबर “जय जय दुर्गे शुभंकरें” नाट्य, भक्ती व अभिजात भावगीत संध्या, स्वरप्रदीप – गायक : डॉ. प्रदीप सरमोकादम. सोमवार दि. १९ ऑक्टोबर २०२६ : मंत्रजागर. मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२६ सकाळी : नवरात्रोत्थापन, दसरा. सायं ४ ते ६ : लळीताचे कीर्तन. महाप्रसाद रविवार दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ ते २.३० पर्यंत. दसरा मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२६ सायं. ५.३० वा. – सोने लुटणे.
नवरात्रोत्सवाची सांगता रविवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते २.३० या वेळेत महाप्रसाद होणार आहे. तसेच मंगळवार २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. भाविकांनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन श्री दुर्गोपासक ऐक्यवर्धक संघाने केले आहे.













