आंजणारी येथील घटना, बंदुक, काढतूससह ,१० ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
संतोष कोत्रे
लांजा : रात्रीच्या सुमारास जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी झाडी झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या दोघांच्या लांजा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना शनिवारी रात्री १.५५ वाजण्याच्या सुमारास आंजणारी शिरंबवली रस्त्यावर ओवलाचा दांडा या परिसरात घडली असून पोलिसांनी या घटनेत १२ बोर काडतुस बंदूक, चार जिवंत काडतुसे असा एकूण १० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा पोलिसांचे एक पथक शनिवारी रात्री १.५५ वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना आंजणारी शिरंबवली जाणाऱ्या रस्त्याच्यालगत ओवलाचा दांड या परिसरात जंगली प्राण्यांच्या शिकार करण्यासाठी दीपक वसंत पाष्टे (वय 33, राहणार आंजणारी पाष्टेवाडी) आणि सुदर्शन श्रीकांत सावंत (वय ३५, राहणार कशेळी, नाणीज, तालुका रत्नागिरी) हे दोघेजणझाडे झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या अवस्थेत आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे असलेले १२ इंच बोअर काडतूुस
बंदूक (किंमत १० हजार रुपये) तसेच ४०० रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे , ५०० रुपये किमतीची टॉर्च, असा एकूण १० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
जंगली प्राण्यांचे शिकार करण्याच्या उद्देशाने
गैर कायदा, बिगर परवाना, बंदूक तसे जिवंत काडतुसे जवळ बाळगल्या च्या अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांनी दीपक पाष्टे आणि सुदर्शन सावंत या दोघांवर भारतीय हत्यार अधिनियम १९५२ चे कलम ३ (१),/ २५ , भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास जाधव हे करत आहेत












