ओटवणे (प्रतिनिधी )
ओटवणे गावचे सुपुत्र आणि कांदिवली उत्तर नियंत्रण कक्षाच्या विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश महादेव परब यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल, दिलेल्या योगदानाबद्दल आणि सेवेबद्दल त्यांना महाराष्ट्र लोकभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याहस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनाला पोलिस दलात उल्लेखनीय, गुणवत्तापूर्वक कामगिरी आणि शौर्य बजावणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर केली जातात.आणि त्यांना राज्यपालांच्याहस्ते पदक प्राप्त झालेल्यांना त्यांचे नाव कोरलेली पदके आणि प्रशस्तिपत्रक प्रदान केले जाते.यावर्षीच्या या मानाच्या पदकासाठी पोलिस उपनिरिक्षक प्रकाश परब यांच नाव घोषित झालं होत.पोलीस दलात परब यांनी ३६ वर्षे प्रामाणिक सेवा बजावली आणी त्यांच्या कामाची दखल आणि पोचपावती त्यांना पदकाच्या रूपाने मिळाली मिळाली.
ओटवणे गावचे मूळ रहिवासी असलेल्या प्रकाश परब यांचे सर्व शिक्षण मुंबईतच झाले.वडील पोलीस खात्यातच असल्याने सेवेच बाळकडू त्यांना घरातच मिळाल त्यांचे वडिल पोलिस खात्यात हवालदार म्हणून कार्यरत होते . तो वारसा प्रकाश परब यांनी समर्थ पणे पुढे नेला वडिलांच्याच खात्यात रुजू झाले आणि पोलीस खात्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत.जरी मुंबई स्थित असले तरी आपल्या गावशी जुळलेली नाळ कधीच तुटू दिली नाही ओटवणे गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमात यांचा सहभाग असतो. मुंबईस्थित ओटवणे ग्रामस्थ मंडळाचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. प्रकाश परब महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुंबई विभागात १९८८ मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी दादर येलोगेट, कुर्ला, बोरिवली, चुना भट्टी, गोरेगाव, कस्तुरबा मार्ग, एम एच बी कॉलनी, सशस्त्र विभाग नायगाव या पोलिस स्थानकामध्ये सेवा बजावली.
मिरा – भाईंदर व वसई-विरारचे पोलिस आयुक्त निकेत कौशिक, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके, मधुकर पांडे, विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी है सुरक्षा) प्रवीणकुमार पडवळ व विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके) निथीश मिश्र या अधिकाऱ्यांसह १०३ पोलिस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक मिळविललेल्या मध्ये समावेश आहे. या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ पंकज भोयर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त महासंचालक (एटीएस) नवल बजाज यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, आणि पदक प्राप्त मानकरी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.ओटवणे गावच्याशीरपेचात मानाचा तुरा खोवलेल्या प्रकाश परब यांच्यावर सर्वच स्थरातून अभिनंदन तसेच शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.












