सुभेदार मेजर श्री संजय सावंत यांचा रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लाच्या वतीने सन्मान…

वेंगुर्ले : प्रतिनिधी

कारिवडे सावंतवाडी येथील सुभेदार मेजर श्री संजय लक्ष्मण सावंत यांनी “ऑपरेशन सिंधूर, ऑपरेशन पराक्रम, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक, टेरर अटॅक अश्या आर्मीमधील वेगवेगळ्या ऑपरेशन मध्ये सहभाग घेऊन नेतृत्व केल असून प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला. त्यामुळे सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत यांचा रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लाच्या वतीने  प्रेसिडेंट आनंद बोवलेकर   यांनी शाल श्रीफळ व मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार केला.
या वेळी संजय सावंत यांनी आपल्या मिलिटरी मधील ३३ वर्षाचा अनुभव सांगितला. रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिड टाऊन चे प्रेसिडेंट आनंद बोवलेकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ व अन्य रोटरी क्लब सदस्य यावेळी उपस्थित होते.