माखजन इंग्लिश स्कूल येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व ॲड.पी.आर.नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सहाय्यक शिक्षक गौरव पोंक्षे यांनी विद्यार्थ्यांना डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.डॉ.कलाम यांनी विज्ञान तंत्रज्ञानात भारतासाठी कसे भरीव काम केले व त्यांना भारतरत्न,पद्मभूषण,पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन कसे सन्मानित करण्यात आले याविषयी श्री पोंक्षे यांनी सविस्तर सांगितले. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त जागतिक विद्यार्थी दिन व वाचंन प्रेरणा दिन साजरा केला जातो या विषयी देखील मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांमधून कल्याणी साठे,आदिती कातकर यांनी डॉ.कलाम यांच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेतला.
मुख्याध्यापक महादेव परब यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यादिनी प्रशालेच्या वाचनालयात जाऊन विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचण्याचा संकल्प करा, वाचनाची आवड निर्माण करा तरच वाचन प्रेरणा दिन खऱ्या अर्थाने साजरा केल्याचे फळ मिळेल असे मुख्याध्यापक महादेव परब यांनी सांगितले.
यावेळी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली अर्पण करण्यात आली.पर्यवेक्षक अंबादास घाडगे यानी आभार मानले.यावेळी रुही पाटणकर,कांचन जंगम,मानसी कोवळे,हर्षदा कदम,हरिश्चंद्र पागडे,सचिन कदम,रवींद्र पवार,सुनील दिंडे,गट प्रमुख विठ्ठल भोईर आदिंसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.