ओझरेखुर्द येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

crime

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील ओझरेखुर्द येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे ओझरेखुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंदार अनिल केदारी (वय-२१) असे मृत तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ओझरेखुर्द येथे संबंधित तरुणाने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्याच्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. या तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक कारणामुळे ही घटना घडली की यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. या घटनेची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.