महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ मध्ये ‘युवा गणेश मित्र मंडळ- निव्याचा राजा’चा रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक

सन्मान सोहळा दि. १६ ऑक्टोबर रोजी सायं. ३ वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे सन्मान सोहळा पार पडला

देवरूख (प्रतिनिधी):

महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून युवा गणेश मित्र मंडळ अर्थात ‘निव्याचा राजा’, निवे बुद्रुक या मंडळाने प्रथम क्रमांकाचे मानाचे पारितोषिक पटकावले असून ही निवे बुद्रुक गावासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

या मंडळाची स्थापना सन २००७-२००८ च्या सुमारास अवघ्या १२ मित्रांनी एका छोट्याशा खोलीत बसून केली होती. सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात विरोधाचाही सामना करावा लागला, परंतु सर्व मित्रांच्या एकजुटीने, जिद्दीने आणि अथक परिश्रमाने हे मंडळ आज भक्कमपणे उभे राहिले आहे. आज या मंडळात तब्बल ५० सक्रिय सदस्य आहेत.

या मंडळास यापूर्वी मिळालेले सन्मान :
– पु. ल. देशपांडे महाराष्ट्र शासन – संगमेश्वर तालुका प्रथम सन्मान
– रत्नागिरी पोलीस अधीक्षक सन्मान
– देवरूख पोलीस ठाणे सन्मान
– मंगलमूर्ती सजावट स्पर्धा सन्मान
– शिस्तप्रिय मंडळ सन्मान

या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपून पाणी अडवा पाणी जिरवा, इतिहास साक्ष देखावा, धार्मिक देखावा आणि यावर्षीचे विशेष आकर्षण ‘किल्ले संवर्धन काळाची गरज – किल्ले महिमतगड’ हा देखावा दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या मोलाच्या सहकार्याने सादर करण्यात आला होता.

मंडळाचे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम :
सांस्कृतिक महिला फुगडी कार्यक्रम, खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर, शैक्षणिक साहित्य वाटप, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, विद्यार्थी सन्मान, वृक्ष लागवड, स्वच्छता मोहीम, नदी पात्र स्वच्छता, मंदिर स्वच्छता, ज्येष्ठांचा सन्मान, विधवा माता सन्मान, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, छत्रपती शिवाजी महाराज जीवन परिचय व्याख्यान आदी उपक्रम मंडळ वर्षभर राबवित असते.
या मंडळाला आमदार शेखर निकम सर, मा. आमदार सदानंद चव्हाण साहेब, मा. आमदार सुभाष बने साहेब, मा. राज्यमंत्री रविंद्र माने साहेब, सन्मा. प्रशांत यादव भाजपा जिलाध्यक्ष, सन्मा. प्रमोद अधटराव जि.प. सदस्य, मा. जि.प. अध्यक्ष रोहन बने सर, जि.प. सदस्य नेहा रविंद्र माने मॅडम, पफुल चंद्र बाईत उपसभापती संगमेश्वर,, सन्मा. जनक जागुष्टे यांचे आशिवार्द मंडळास आहेत
गणरायाप्रती असलेली निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि वर्षानुवर्षे केलेल्या सेवेचे हे फळ असून हे यश केवळ पारितोषिक नसून अनेक वर्षांच्या मैत्रीचे, त्यागाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे.

सन्मान सोहळा :

हा सन्मान सोहळा दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं. ३ वाजता, रवींद्र नाट्य मंदिर, पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे ना. अॅड. आशिष शेलार साहेब (सांस्कृतिक कार्यमंत्री)यांच्या शुभ हस्ते देण्यात आला

या यशाबद्दल सन्मा. सुरेश कदम साहेब यांनी मंडळाच्या पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन आशीवार्द दिले या सन्मानासाठी सर्व जुन्या-नव्या सदस्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.