प्रभाग क्र. १२ व १४ मधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या चिपळूण शहर मंडलाच्या शहराध्यक्षपदी आशिष खातू तर महिला शहराध्यक्षपदी रुही खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे प्रभाग १२ व १४ मधील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी महेश दीक्षित, रोहन जडे, महेश कांबळी, जगदिश गोरिवले, महेश नरळकर, दमयंती नरळकर, दिनेश लटके, विलास चव्हाण, परेश मोरे, दिलनवाज बेबल आणि दीक्षा जाधव यांनी नवनियुक्त शहराध्यक्ष व महिला शहराध्यक्षांचे अभिनंदन केले. या प्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते आणि भाजपा ओबीसी सेलचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर उपस्थित होते. नवीन नियुक्त्यांमुळे चिपळूण शहरातील पक्षाच्या संघटनात्मक कामाला चालना मिळावी, अशी अपेक्षा यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.













