Rajapur Breaking: महामार्गावर वाटूळ येथे इनोव्हाची रिक्षाला धडक पाच जण गंभीर जखमी

राजापूर प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गावर वाटूळ येथील उतारावर राजापूरकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या रिक्षाला पाठीमागून येणाऱ्या इनोव्हाकारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील दोन मुलांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

तातडीने या जखमींवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. सदरची रिक्षा ही राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे येथील असल्याची माहिती पुढे आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ राजापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.