गोवा पत्रादेवी येथिल अपघातात सरमळे येथिल मंगेश गावडे या इसमाचा मृत्यू

ओटवणे (प्रतिनिधी ) काल रात्री मुंबई गोवा महामार्गावर पत्रादेवी टोलनाका येथे झालेल्या भीषण अपघातात सरमळे येथिल मंगेश रघुनाथ गावडे वय ५५ यांचा जागीच मृत्यू झाला तर ओटवणे येथिल दुचाकीस्वार युवक जखमी झाला हा अपघात रात्री 11.30 च्या दरम्यान घडला.

ओटवणे येथिल साहिल तारी हा आपल्या दुचाकीने गोवा मार्गावरून येत होता याच वेळी कामानिनिनित्त गोवा येथे गेलेले मंगेश गावडे हे ररस्ता ओलांडत होते.यावेळी त्याची जोरदार धडक बसली ही धडक एवढी भयंकर होती कि मंगेश गावडे हे रस्त्यावर फेकले गेले यात त्यांना गंभीर दुखापत झाली त्यांना इस्पितळात हलविण्यात आले मात्र त्यांना डॉक्टरानी मृत घोषित केले. मध्यमवर्गीय परिस्थिती असलेले गावडे हे पायलेटिंग तसेच शेतीवर आपला उदर निर्वाह करायचे त्यांच्या जाण्याने गावडे कुटुंबियांवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पच्छात भाऊ, पत्नी, तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे.मनमिळावू आणि खेळकर स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवाराही मोठा आहे त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे निधनाची बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या घरी धाव घेत गावडे कुटुंबियांचे सांत्वन केले.