लांजा (प्रतिनिधी): लांजा तालुक्यातील शिपोशी येथे रविवार १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या ‘सह्याद्री हिल्स मॅरेथॉन’, २०२६ मध्ये महाराष्ट्रसह गोवा कर्नाटक, गुजरात येथील स्पर्धक सहभागी होणार आहेत.
सह्याद्रीच्या खोऱ्यात आणि लांजा तालुक्यात
प्रथमच हाी स्पर्धा होणार असल्याने या भव्य दिव्य स्पर्धेबाबत विशेष आकर्षण आहे. या स्पर्धेत राज्याच्या विविध भागातून तसेच राज्याबाहेरील एकूण ४७१ स्पर्धक सह्याद्री व कोकणाच्या निसर्गरम्य परिसरात धावणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सह्याद्री हिल्स मॅरेथॉन, २०२६ मध्ये स्थानिक व राज्याच्या विविध भागांतील तसेच राज्याच्या बाहेरील धावपटूंचा सहभाग असल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि धावप्रेमींनीही सहभागी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.













