परतीच्या पावसाचा कोकणात रब्बी हंगामासाठी फायदा

गौरव पोंक्षे माखजन :
मागच्या आठवड्यात मेघ गर्जनांसह बरसलेल्या परतीच्या पावसाचा फायदा कोकणातील रब्बी हंगामासाठी होणार आहे.
मागच्या आठवड्यात बहुतांश ठिकाणी खूप पाऊस झाल्याने शेट जमिनी चांगल्या ओल्या झाल्या आहेत.याचा फायदा शेतकऱ्यांनी उचलत ट्रॅक्टर च्या सहाय्याने रब्बी हंगामासाठी पेरणी केली आहे.कोकणात ओलसर असताना पेरणी झाली की,पीक उगवल्या नन्तर सकाळी पडणाऱ्या दवावर रब्बी पीक येते.
परंतु यावर्षी गणपतीपूर्वी पावसाने दडी मारल्याने,शेत जमिनी सुखल्या होत्या.तामुळे रब्बी हंगामाची पेरणी करायला शेतकरी कचरत होते.परंतु परतीचा पाऊस दोन तीन दिवस सलग झाल्याने,जमिनी ओलावा धरून आहेत.याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.अनेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असल्याने पेरणी देखील अल्पावधीत पूर्ण होण्यास मदत होत आहे.पुढे दव किती पडते आणि पीक कसे येते हे पूर्णपणे निसर्गाच्या विविध बदलावर अवलंबून राहणार आहे.