मुणगे कातकरी वस्तीमध्ये दिवाळी फराळ वाटप!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मुणगे येथील मौजे आडबंदर कारीवने पोलीस पाटील श्री. तुषार आडकर आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष बांदेकर यांच्या वतीने दिवाळीचा पहिल्याच दिवशी वसुबारस निमित्त ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि कातकरी वस्तीतील ग्रामस्थांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. दिपावली आणि नूतन पाडव्यानिमित्त शुभेच्छा देत सर्वांचा आनंद द्विगुणित केला. कर्मचारी व ग्रामस्थांनी दोघांचेही मनःपूर्वक आभार मानले.