गणित संबोध परीक्षेत आवळेगाव हायस्कूलचे घवघवीत यश

दोन विद्यार्थ्यांची गणित प्राविण्य परीक्षेसाठी निवड

स्वप्निल कदम l कुडाळ :      सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे आयोजित गणित संबोध परीक्षेत आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आवळेगाव हायस्कूल व कला-वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय, आवळेगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

 

या परीक्षेसाठी इयत्ता आठवीतील एकूण दहा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी दोन विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, एक विद्यार्थी प्रथम श्रेणीत, एक विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर सहा विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे, यातील दोन विद्यार्थ्यांची पुढील गणित प्राविण्य परीक्षेसाठी निवड झाली आहे.

 

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती मानसी सावंत, सचिव भिकाजी तळेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. दशरथ काळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि पालकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.