स्वप्निल कदम -कुडाळ : श्री कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था, कसाल संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल येथे शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक यांच्या वतीने 100 होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देणारा हा उपक्रम ठरणार असून परिसरात त्याचे स्वागत होत आहे.
या कार्यक्रमास कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते तसेच शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर अशोक पाटकर यांच्या सौजन्याने आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम गुरुवार दिनांक 02 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जि.प. सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रमोदजी कामत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, वाशी (नवी मुंबई) उपशहर प्रमुख महेश (बाबू) परब, भाजप सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रभाकर सावंत, जि.प. सदस्या सुप्रिया वालावलकर तसेच कसालचे सरपंच राजन परब हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून संस्थेचे अध्यक्ष भाई सावंत, सचिव यशवंत परब, शालेय समिती अध्यक्ष नविन बांदेकर व मुख्याध्यापक उत्तम मळगांवकर यांनी सर्व मान्यवर व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाची सोय सुलभ करून त्यांच्या शिक्षणाला चालना देणारा हा उपक्रम ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.












