गौरव पोंक्षे माखजन :
कोंकणातील घर म्हटलं की, डोळ्यासमोर पटकन येत ते कौलरू घर आणि चारही बाजूला शेणाने सारवलेले अंगण. कालपरत्वे वाढलेली, गडी माणसांची मजुरी यामुळे दरवर्षी पाऊस गेला की अंगणी करण कठीण होऊन बसल आहे.
पण अंगण नाही केल तर ती कोकणातील मजा तरी कशी येणार.यावर सध्या कोकणातल्या गावाकऱ्यांनी शक्कल लढवली आहे.थेट शेतात चालवला जाणारा पॉवर टीलर अंगणात चालवून,अंगण.खणण्याचे काम करत आहे.
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात,अगदी छोटे पॉवर टीलर उपलब्ध आहेत.त्यामुळे शेतकरी हे छोटे पॉवर टीलर घेतो.व त्याचा उपयोग देखील बहुपर्यायाने करता येत आहे.
थेट अंगण खणताना या ग्रामस्थाशी संवाद साधल्यावर असे लक्ष्यात आले की,की जेवढे अंगण ४ महिला व एक पुरुष आदिनी मिळून दिवसभरात खणले असते.ते पॉवर टीलर च्या साहाय्यायने अवघ्या दीड तासात खणून झाले.४ महिला व १ पुरुष कामगार यांची मजुरी १७००/- रुपये झाली असती तर पॉवर टीलर ला फक्त ४५ रुपयांच डिझेल लागलं.
मजुरांकडून काम करून घेताना कुदळ,खंटी,टीकाव आदी अवजरांची गरज लागते.शिवाय या प्रत्येक अवजाराचा स्वतंत्र देग भालीचा खर्च व मजुरांचे चहा पाणी.या साऱ्याला कंटाळून अलीकडे गावातील रहिवाशांनी खणून अंगणी न करता,नुसता शेणखोळा टाकून जशी जमतील तशी अंगणी करायला सुरवात केली होती.पण पॉवर ट्रिलर ची शक्कल गावा गावात लढवली जात असल्याने सध्या,घराभोवतली अंगणी करण्याचा खर्च कमी होऊ लागला आहे.













