रत्नागिरीतील सुप्रसिद्ध सुवर्णकार सागर नार्वेकर यांचे दुःखद निधन

रत्नागिरी :

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध सुवर्णकार सागर नार्वेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. कोल्हापूर येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सागर नार्वेकर हे विविध बँकांचे व्हॅल्यू एडिटर म्हणून कार्यरत होते. तसेच मनसेचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी सामाजिक क्षेत्रात सक्रिय काम केले होते. मनमिळाऊ स्वभाव, सर्वांशी प्रेमाने वागणे यामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांच्या जाण्याने रत्नागिरी जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.