डांगमोडे येथे 14 नोव्हेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

मसुरे | झुंजार पेडणेकर :श्री देव रवळनाथ देवस्थान ट्रस्ट, मसुरे – डांगमोडे यांच्या वतीने श्री देव रवळनाथ मंदिर येथे सालाबादप्रमाणे यंदाही ७ दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री देव रवळनाथ देवालय येथे १४ नोव्हेंबर पासून या अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होत आहे. हा सोहळा समाप्ती कार्तिक शुद्ध द्वादशी शके १९४८, दिनांक २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

सर्वांनी भजन मंडळींसह श्रींचे दर्शनास येऊन, हरिनाम गाऊन या कार्यक्रमास शोभा आणावी आणि महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा, अशी नम्र विनंती विश्वस्त, ठाकूर कुटूंबीय व डांगमोडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.