पळसंब श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात 20 रोजी अखंड हरिनाम सप्ताह

मसुरे | झुंजार पेडणेकर :पळसंब वरचीवाडी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात 20 नोव्हेंबर रोजी सात प्रहराचा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या दिवशी सकाळी ठीक ८ वाजता चिठ्ठ्या टाकून नंबर दिले जातील. भजन मेळावांसाठी महाप्रसादाची व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

या धार्मिक कार्यक्रमात परिसरातील सर्व भाविकांनी व आपल्या भजनी मेळासह मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सोहळ्याची शोभा वाढवावी, तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई देवालय ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.