आ. किरण सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन
शाखेच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
राजापूर प्रतिनिधी : राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या भू शाखेच्या आठव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शाखेचा नूतन वास्तूमध्ये स्थलांतर सोहळा शनिवार १४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या शुभहस्ते शुभारंभ करून पतपेढीचे नवीन वास्तुत स्थलांतर होणार आहे.
हा कार्यक्रम पाचवांग कुणबी मंडळाच्या नूतन इमारतीत, भू, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता भू येथे होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरीचे राम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या आठव्या वर्धापन दिन व स्थलांतर सोहळयाला राजापूरच्या सहाय्यक निबंधक प्रिया कांबळे, कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे अध्यक्ष शिवाजी तेरवणकर, ग्रामीण समितीचे अध्यक्ष दीपक नागले, जिल्हा डोंगरी विकास समितीचे सदस्य रवींद्र नागरेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कुवळेकर, पंचायत समिती सदस्य राजेश गुरव, भू विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष मोनोज कदम, ज्येष्ठ प्रवर्तक मंडळ सदस्य सुरेंद्र तांबे, भू ग्रामपंचायत प्रशासक प्रदीप सावंत, पाचगाव कुणबी मंडळ भू चे अध्यक्ष सिताराम निनावे, पाचगाव कुणबी ग्राहक भांडारचे अध्यक्ष सिताराम पडयार, व्यापारी संघ अध्यक्ष शरद पाध्ये, भू पंचक्रोशी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाध्ये, संचालक लक्ष्मण सावंत, धनाजी तांबे यांच्यासह सहकार, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तीर्थप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता हळदीकुंकू समारंभ होणार आहे.
या सोहळ्यास सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक, समाजबांधव आणि नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, पालक संचालक सोनू तिर्लोटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, पदाधिकारी, संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.













