लायन डॉ. शमीना परकार यांच्या नेतृत्वाखाली गुहागर बीच स्वच्छता अभियान उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : लायन्स इंटरनॅशनल 3234 D-१ रिजन-५ झोन चेअरपर्सन लायन डॉ. शमीना परकार यांच्या नेतृत्वाखाली व गुहागर नगरपंचायतीच्या विशेष सहकार्याने गुहागर बीच, दुर्गादेवी बीच, वरचा पाट परिसरात नुकतेच विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी, लायन्स क्लब ऑफ चिपळूण युनिटी, लायन्स क्लब ऑफ सावर्डे, लायन्स क्लब ऑफ सावर्डे, आयडियल, लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी, लायन्स क्लब ऑफ चिपळूण आयडियल व सर्व क्लबच्या लायन सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत समुद्रकिनारा व परिसर स्वच्छ केला.
या कार्यक्रमाला गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण तसेच रिजन ५ चे रिजन चेअरमन लायन डॉ. निलेश पाटील MJF यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, सर्व क्लबचे स्वागत, तसेच अभियानानंतर चहापान व अल्पोपहाराची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. पर्यावरणाचा समतोल राखणे ही केवळ जबाबदारी नाही, तर आपले कर्तव्य आहे. आपला समुद्र स्वच्छ ठेवणे म्हणजे आपल्या पुढील पिढीसाठी सुंदर निसर्ग जपणे होय. आजची स्वच्छता मोहीम हा केवळ एक उपक्रम नाही, तर ‘स्वच्छ समुद्रकिनारा- निरोगी पर्यावरण- सुंदर गुहागर’ या संकल्पनेचा एक सकारात्मक संदेश आहे.