दिल्लीतील गालिब अकॅडमीमध्ये राष्ट्रीय सोहळ्यात गौरव
शिक्षण आणि उर्दू भाषा संवर्धनातील योगदानाची दखल
चिपळूण (प्रतिनिधी) : पोफळी सय्यदवाडी येथील शिक्षक शमसुद्दीन उमर सय्यद यांना कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघ इंडिया यांच्यावतीने प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. दिल्ली येथील गालिब अकॅडमीमध्ये ११ नोव्हेंबरला झालेल्या विशेष राष्ट्रीय सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी केलेले कार्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी यांची दखल घेऊन सय्यद यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी वासिल अली गुर्जर आणि राष्ट्रीय सचिव विकास कुमार राणा यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली होती.
या राष्ट्रीय पुरस्कारामुळे पोफळीच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सय्यद यांच्या यशाबद्दल शाहीन एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी आयाज हाजी गुलाब बागवान, शाहीन स्कूलचे मुख्याध्यापक सय्यद आणि शाहीन हायस्कूलचे मुख्याध्यापक मोमीन यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो फाईल- सीपीएन१३-५
दिल्ली येथील गालिब अकॅडमीमध्ये राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कार स्वीकारताना शमसुद्दीन उमर सय्यद.













