अनियमित भगवंतगड गाडी मुळे लब्देवाडी ग्रामस्थ हैराण

आंदोलनाच्या पवित्र्यात

आचरा-अर्जुन बापर्डेकर

 

चिंदर लब्देवाडीत भागात एसटी बस च्या सुरू असलेल्या बसफे-या अनियमित सुरू असल्याचा आरोप करत चिंदर लब्देवाडी ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

या अनियमित बस फे-यांमुळे ग्रामस्थ , विद्यार्थी यांना आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.तरी या गाड्या नियमित सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

चिंदर लब्देवाडी ग्रामस्थ सुभाष लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात दिवसातून एसटीच्या तीन फेऱ्या सुरू आहेत.यातील पहिली फेरी सकाळी ७.२०ला कुडोपीवरुन भगवंतगड करुन लब्देवाडी ब्राम्हण देव मंदिर येथे येते.दुसरी फेरी भगवंतगड मालवण सकाळी लब्देवाडी येथे साडेआठ च्या दरम्याने येते. तीसरी फेरी लब्देवाडी येथे सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्याने पोहोचते.मात्र या फे-या मधील काही फे-या रविवारी बंद असल्याने आठवडा बाजारात आच-याला जाणा-या लोकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.तर कधी कधी गुरुवारी ही गाड्या बंद केल्या जात असल्याचे लब्देवाडी ग्रामस्थ सांगतात.त्यामुळे सदर फे-या रविवार सह आठवड्याचे सर्वच दिवस नियमित सुरू न ठेवल्यास आक्रमक पवित्रा घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.