फोंडाघाट ग्रामपंचायत व सामाजिक कार्यकर्ते सुहास मोदी यांची मागणी !
बांदा ते कनेडी राज्य मार्गाचे उर्वरित ३८ की.मी.चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी, पालकमंत्री आणि सा.बां. विभाग अधीक्षक अभियंता यांना निवेदन !
फोंडाघाट : सार्वजनिक बांधकाम विभागाने, सुमारे दहा वर्षांपूर्वी,सह्याद्रीच्या पायथ्याच्या गावांचा विकास होण्याच्या दृष्टीने बांदा ते कनेडी, हा पूर्वी असलेल्या मार्गला राज्य महामार्ग क्रमांक१९० हा क्रमांक दिलेला आहे. हा मार्ग कनेडी येथे आचरा, कणकवली, कणेडी , फोंडाघाट, वैभववाडी, उंबार्डे या राज्यमार्ग क्रमांक १८० ला मिळतो. म्हणजेच बांदा ते वैभववाडी असा सरळ व मुंबई- गोवा रस्त्याला समांतर रस्ता होईल…
या महामार्गावरील सावंतवाडी मतदारसंघात येणारा बांदा ते दाणोली या भागाची तेथील आमदार केसरकर यांनी दुपदरीकरण व मजबुतीकरण करून घेतले आहे. फोंडाघाट ते वैभववाडी या भागाचे काम झालेले आहे. तसेच कनेडी- फोंडाघाट या भागाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी राज्यमार्ग क्रमांक १९० च्या उर्वरित भागाचे ३८ किलोमीटरचे काम दुपदरीकरण व मजबुतीकरण झाल्यास, कुपवडे, कळसुली, दारिस्ते, नाटळ, कनेडी, हरकुल खुर्द, फोंडाघाट, लोरे, खंबाळे या ग्रामीण गावांचा विकासाच्या दृष्टीने अतिशय चांगला उपयोग होईल.व पर्यटनही वाढेल. सदर काम झाल्यास कनेडी येथुन तीस मिनिटात टेंबे स्वामी -माणगाव व साटम महाराज मठ- दाणोलीला जाता येईल. तर एका तासात बांदा किंवा आंबोलीला पोहोचता येते. यामुळे व्यापारउदीम आणि पर्यटनाला चालना मिळेल. तरी त्या रस्त्याचा गांभीर्याने विचार करून आणि शासनाकडे पाठपुरावा करून ग्रामीण भागातील जनतेची सोय करावी. अशी ग्रामस्थांची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुहास मोदी आणि ग्रामपंचायत ठराव द्वारे केली आहे…..












