वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी येथील रहिवासी किशोरी गोसावी यांचे चार दिवसांपूर्वी आकस्मिक घर जळून मोठे नुकसान झाले होते. त्यांना आज आ. दीपक केसरकर यांच्यामार्फत आर्थिक सहकार्य करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्यामार्फत ही मदत त्यांना सुपूर्त करण्यात आली. यावेळी उपसभापती सचिन देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संघटक सुनील डूबळे, जिल्हा परिषद सदस्य सौ. यज्ञा साळगावकर, शाखाप्रमुख दिनकर पालव, वेतोरे शाखाप्रमुख विघ्नेश गावडे, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, उपतालुकाप्रमुख सचिन राऊळ, विभागप्रमुख मितेश परब, सुधीर गावडे, विश्राम परब आदी उपस्थित होते.













