आंगणेवाडी येथे 17 रोजी श्री भराडीदेवी मंदिर सुवर्ण कलश वर्धापनदिन सोहळा!

▪️विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर : कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील

श्री देवी भराडी मंदिराचा २२ वा सुवर्ण कलश वर्धापनदिन सोहळा १७ नोव्हेंबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने मंदिरामध्ये आंगणे कुटुंबियांमार्फत विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबर रोजी

रात्री ९.०० वाजता: स्थानिक मुलांचे रेकॉर्ड डान्स, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.०० वाजता शिवशक्तीयाग,

दुपारी १२.०० वाजता सुवर्ण कलश व ध्वज पूजा, दुपारी १२.३० वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १.०० वाजता महाप्रसाद, संध्याकाळी ७.०० वाजता सुस्वर भजने, रात्री ठीक ९.३० वाजता मनोरंजनात्मक ‘मराठी पाऊल पडतं पुढे’ हा महाकलाविष्कार सादर केला जाईल. (दिग्दर्शक/निर्माते: उदय साटम, सह-निर्माती: सौ. ज्योती उदय साटम).

१८ नोव्हेंबर रोजी

रात्री ठीक १०.०० वाजता श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, कसई – दोडामार्ग प्रस्तुत ‘देवाचा डोंगर’ हा पौराणिक रहस्याने युक्त नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी आणि आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.