राजकारणविरहित क्रीडा स्पर्धेतून गावातील तरुणांची एकजूट; दरवर्षी स्पर्धा आयोजित करण्याचा निर्धार
रत्नागिरी :
गडनरळ प्रीमियर लीग (GPL) पर्व १
२०२६ ही क्रिकेट स्पर्धा रविवार, १५ नोव्हेंबर रोजी विरार पूर्व येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. गावातील तरुणांना एकत्र आणणे, त्यांच्यातील मैत्रीचे बंध अधिक दृढ करणे आणि गावाची एकजूट जपणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या उद्देशाला यशस्वी प्रतिसाद देत गावातील तब्बल ९६ खेळाडूंनी सहभाग घेतला. आठ संघांमध्ये विभागलेल्या या स्पर्धेत गावातील संघमालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेत वैभव ११, मुकुंद ११, आदितना ११, एस. एस. ब्लास्टर, कोकण टॉकीज, पी.जी., क्रिकेट क्लब आणि आपली माणसं असे आठ संघ सहभागी झाले होते. या संघांचे मालक अनुक्रमे श्री. वैभव धनावडे, श्री. चिंतामणी धनावडे, श्री. रंजीत भातडे, श्री. संदेश चौघुले, श्री. अमोल भातडे, श्री. प्रमोद चौघुले, श्री. संदीप धनावडे आणि कु. मयुरेश चौघुले होते.
अटीतटीच्या सामन्यांनंतर वैभव ११ संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाचे नेतृत्व कु. विकास हरिश्चंद्र धनावडे यांनी केले. एस. एस. ब्लास्टर संघाने द्वितीय, तर कोकण टॉकीज संघाने तृतीय क्रमांक मिळवला. मालिकावीर म्हणून कु. अक्षय धनावडे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्री. वैभव धनावडे आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून श्री. योगेश यशवंत धनावडे यांना गौरविण्यात आले.
या स्पर्धेला माजी आमदार श्री. सुरेंद्रनाथ (बाळ) माने यांच्यासह श्री. बाबू पाटील, श्री. प्रथमेश गोपाळ गावणकर, श्री. समीर रामदास बळेकर, श्री. नारायण धनावडे, रोहित महाडिक, नील नागेश धनावडे, रामचंद्र धनावडे, दीपक भातडे, प्रमोद चौघुले, अरुण चौघुले, शैलेश कानसरे, केशव भातडे, हरिश्चंद्र धनावडे, अंकुश धनावडे, प्रकाश धनावडे, दुर्वास झि. चौघुले, भिकाजी धनावडे, वामन भातडे, मिलिंद धनावडे, प्रदीप चौघुले, गणेश काताळे, शुक्रदीप शिंगारे, विजय धनावडे, मनोहर चौघुले, दिनकर भातडे, ओमकार शितप, रविंद्र चौघुले, देवधर भातडे, महेश भातडे, रुपेश चौघुले, संतोष जानू धनावडे, सुनील धनावडे आणि संजय भातडे यांच्यासह अनेक मान्यवर, हितचिंतक व आर्थिक सहकार्य करणारे ग्रामस्थ उपस्थित होते.
या स्पर्धेचे तरुणांनी एकत्र येऊन या स्पर्धेचे आयोजन केले. खेळाडूंसह गावातील सुमारे १६० जणांची उपस्थिती लाभली. संपूर्ण दिवस खेळाचा आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण अनुभवायला मिळाले. पहिल्याच पर्वाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आयोजकांसाठी प्रेरणादायी ठरला.
यावेळी गडनरळ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. दिनकर भातडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आगामी काळातही दरवर्षी ही स्पर्धा आयोजित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. गावातील तरुणांच्या अशा सकारात्मक उपक्रमांना नेहमीच पाठिंबा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
GPL च्या पहिल्या पर्वाच्या यशामध्ये सहभागी खेळाडू, आठही संघांचे मालक, नियोजन व आयोजनासाठी मेहनत घेणारे सर्व तरुण, आर्थिक सहकार्य करणारे दाते, मान्यवर, हितचिंतक आणि उपस्थित ग्रामस्थ या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा संस्थेचे नव्हे, तर गावातील सर्वांच्या एकजुटीचे आणि सहकार्याचे हे यश असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. सर्वांच्या सहकार्याने GPL च्या पहिल्या पर्वाची सांगता उत्साहात झाली.













