रत्नागिरी :
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पारितोषिक असणारे आणि चित्रपट आणि नाट्य क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या कलाकारांचा सतत पाठिंबा असणारी अटल करंडक एकांकिका स्पर्धा रत्नागिरी केंद्रावरती 25 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे .या केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून डॉ.आनंद आंबेकर यांची निवड झाली आहे. डॉ.आनंद आंबेकर विभाग प्रमुख डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सदर स्पर्धा गोगटे कॉलेजमध्ये होणार आहे.
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगु काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अटक करंडक एकांकिका स्पर्धेचे तेरावे वर्ष साजरे होत आहे सदर एकांकिका स्पर्धेसाठी अंतिम स्पर्धा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे १८,१९ आणि २० डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री १० वाजता .या वेळेत होणार आहे. प्रथम क्रमांक 1 लाख , द्वितीय क्रमांक 75000 तृतीय क्रमांक 50000 आणि अनेक पारितोषिक मिळणार आहेत.
रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी 25 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरी येथे सादर होणार आहे प्राथमिक फेरीसाठी प्रथम क्रमांक रोख पारितोषिक 7000 व द्वितीय क्रमांक रोख पारितोषिक 5000 देण्यात येणार आहेत परंतु ही बक्षिसाची रक्कम अंतिम फेरीमध्ये एकांकिका सादर झाल्यानंतर मिळणार आहे.
प्राथमिक फेरीसाठी 23 नोव्हेंबर 2026 पर्यंत डॉ. आनंद आंबेकर 7020737400 यांच्याशी संपर्क साधावा.
सदर स्पर्धा खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे.
Home महत्वाच्या बातम्या डॉ. आनंद आंबेकर यांची अटल करंडक एकांकिका स्पर्धेसाठी रत्नागिरी केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून...












