कल्पना प्रतिष्ठान तर्फे महिलांना दिवाळीनिमित्त पणत्याचे वाटप

आचरा-अर्जुन बापर्डेकर
सणांचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचावा आणि प्रत्येक घरात आनंद ,प्रकाश व समाधान नांदावे या हेतूने कल्पना प्रतिष्ठान मुंबई च्या अध्यक्षा सौ अनुराधा अजित मयेकर यांच्या हस्ते आचरा गावातील महिलांना पणत्यांचे वाटप करण्यात आले .
स्मॉल ऍक्ट बिग चेंज या ब्रीद वाक्य प्रमाणे छोट्याशा मदतीतून मोठा आनंद देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सौ अनुराधा मयेकर यांनी सांगितले.यावेळी त्यांच्या सोबत सुरेखा पुजारे, महानंदा शिर्सेकर, मनिषा पुजारे, माधुरी पुजारे,विनया पुजारे,निता पुजारे,गीता पुजारे,श्रीमती मोर्वेकर यांसह अन्य आदी उपस्थित होते.