भटक्या-विमुक्त बांधवांसोबत भाजपची ‘पालावरची दिवाळी’ उत्साहात साजरी

तरंदळे धनगरवाडीत सामाजिक एकोपा आणि आपुलकीचा संदेश; पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांचा सहभाग

कणकवली : भारतीय सण आणि उत्सवांपासून अनेकदा दूर राहणाऱ्या भटक्या-विमुक्त बांधवांशी भावनिक नाते अधिक दृढ व्हावे आणि त्यांच्या जीवनातही दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा, या उद्देशाने भाजपच्या वतीने कणकवली शहर मंडलातील तरंदळे धनगरवाडी येथे ‘पालावरची दिवाळी २०२६’ उत्साहात साजरी करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही तरंदळे धनगरवाडीतील भटक्या-विमुक्त बांधवांसोबत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवाळीचा आनंद साजरा केला. या उपक्रमातून सामाजिक एकोपा, आपुलकी आणि बांधिलकीचा संदेश देण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाला सण-उत्सवांचा आनंद घेता यावा आणि त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता.

यावेळी कणकवली शहर मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, मंडल उपाध्यक्ष संदीप सावंत, पंचायत समिती सदस्या संजना राणे, तरंदळे सरपंच सुशील कदम, उपसरपंच शुभावली सावंत, ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडीगावकर, सुनीलदत्त जाधव, माजी सरपंच सुधीर सावंत, डॉ. सत्यवान राणे, संदेश सावंत, प्रशांत राणे, संतोष कदम, गजानन सावंत, विलास जाधव, सीताराम खरात, नरेश घाडीगावकर, बाबुराव डोईफोडे, आनंद डोईफोडे, सखाराम खरात, अनिरुद्ध खरात, राजू जंगले, मंगेश डोईफोडे, शांताराम डोईफोडे, अविनाश डोईफोडे, रवींद्र डोईफोडे, जानू खरात यांच्यासह तरंदळे गावातील ग्रामस्थ, महिला व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते.