द्यमनगर येथील खलाशाचा मिऱ्याबंदर खाडीकिनारी आढळला मृतदेह

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
उद्यमनगर येथील खलाशाचा मृतदेह मिऱ्याबंदर येथे आढळला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आला आहे. साकीब मेहबूब काझी (४९, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना बुधवार 18 नोव्हेंर रोजी दुपारी मिऱ्याबंदर येथील खाडी किनारी निदर्शनास आली. साकिब काझी हा कासारवेली येथील बोट मालकाकडे कामाला गेला होतो. त्याला दारुचे व्यसन होते. मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी 10.30 वा. सुमारास बोटीवरिल इतर खलाशांसह तो बोटीवरच होता. पहाटे साडेचार च्या सुमारास तो बोटीवर दिसून आला नाही. तात्काळ इतर खलाशांनी मालकाला समज दिली. बोट मालकाने तात्काळ या बाबत साकीब याच्या घऱी कळविले. की साकीब बोटीवरुन निघून गेला आहे. त्यानंतर त्याची शोधाशोध केली असता तो मिऱ्या येथे मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी तेथे जावून पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.