अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले

गुहागर येथे २९ वर्षीय तरुणावर पोक्सो दाखल

गुहागर/प्रतिनिधी :  इन्टाग्रामद्वारे ओळख करुन व मैत्रीचे नाते निर्माण करुन अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणावर गुहागर पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फिर्यादीत म्हटल्या प्रमाणे संबंधित अल्पवयीन मुलीची डिसेंबर २०२५ समीर कांबळे याच्याबरोबर इन्टाग्रामद्वारे ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्राचे नाते निर्माण झाले. त्यातूनच समीर कांबळे याने हे गैरकृत्य केले. दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वा. च्या सुमारास ओंकार हॉस्पीटल, उल्हासनगर, मुंबई येथे त्या मुलीची प्रसुती होऊन मुलगा झाला. म्हणून समीर कांबळे याच्याविरूद्ध तक्रार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.