दहा हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथे कल्याण मटका नावाच्या जुगारावर लोकांकडून पैसे स्वीकारून बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळणाऱ्या एका व्यक्तीवर सावंतवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई एकोणीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास श्री देव रवळनाथ मंदिर समोर, सातार्डा येथे करण्यात आली.
या प्रकरणी अजित आनंत पेडणेकर (वय पस्तीस, रा. देऊळवाडी सातार्डा, तालुका सावंतवाडी) याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अठराशे सत्याऐंशीच्या कलम बारा (अ) अन्वये गुन्हा नोंद क्रमांक तीनशे बारा ऑब्लिक दोन हजार सव्वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम पस्तीस (तीन) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांना घटनास्थळी कल्याण एकोणीस अकरा दोन हजार सव्वीस असे इंग्रजीत लिहिलेला व खाली आकडेमोड केलेला पांढऱ्या रंगाचा कागद, जुना वापरता चालू स्थितीतील निळ्या शाईचा पेन व निळ्या रंगाचा कार्बन असा मुद्देमाल मिळून आला. याशिवाय दहा हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा पंधरा एस जी मोबाईल आणि सहाशे नव्वद रुपये रोख रक्कम असा एकूण दहा हजार सहाशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रोख रकमेमध्ये दोनशे रुपयांची एक नोट, शंभर रुपयांच्या दोन नोटा, पन्नास रुपयांच्या तीन नोटा, वीस रुपयांच्या चार नोटा आणि दहा रुपयांच्या सहा नोटांचा समावेश आहे.
याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात राजेश वासू गवस (वय ५१) यांनी फिर्याद दिली असून एकोणीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजून चार मिनिटांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सातार्डा दूरक्षेत्रांतर्गत टाकेकर आणि गवस करत आहेत.













