नटखट प्रोडक्शनच्या पहिल्या मराठी चित्रपट ‘संकासूर’चे पोस्टर प्रदर्शित; मुंबई साहित्य संघ गिरगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दणक्यात सोहळा

मंडणगड प्रतिनिधी:
नटखट प्रोडक्शन निर्मित पहिल्या मराठी चित्रपट ‘संकासूर’ चे पोस्टर अनावरण साहित्य संघ, गिरगाव येथे मोठ्या उत्साहात व दणक्यात संपन्न झाले. नटखट प्रोडक्शनचे हे एक स्वप्न असून, या सोहळ्याला मान्यवर, पत्रकार, शाहीर व ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावली.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अस्मिता केंद्रे, विंपा फिल्म व नाट्य परिषद संचालक श्री. दिलीप दळवी, माजी कुणबी युवा अध्यक्ष माधव कांबळे,कुणबी युवा अध्यक्ष श्री. युवराज कांबळे, ज्येष्ठ शाहीर भाई देवळे, सामाजिक कार्यकर्ते दौलत पोस्टुरे,सामाजिक कार्यकर्ते श्री. अजित पोस्टुरे, निर्माते श्री. योगेश प्रधान, कलगी तुरा मंडळ सरचिटणीस श्री. संतोष धारशे, पत्रकार श्री. उदय दणदणे, शाहीर श्री. सुधाकर मास्कर, शाहीर श्री. संदेश मोरे हे उपस्थित होते.

याशिवाय पणदेरी पंचक्रोशी ग्रामस्थ, तसेच मंडणगड तालुक्यातील ग्रामस्थ व महिला यांची मोलाची उपस्थिती व मोलाचे सहकार्य लाभले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन श्री. गणेश सीताराम माळी यांनी केले आहे. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर टाळ्यांच्या गजरात ‘संकासूर’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. दमदार पोस्टर पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे म्हणाल्या, “नटखट प्रोडक्शनने पहिल्याच चित्रपटात इतका दमदार विषय हाताळला आहे, हे खूप कौतुकास्पद आहे. ‘संकासूर’ नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडेल.”

विंपा फिल्म व नाट्य परिषद संचालक दिलीप दळवी म्हणाले, “आजचा तरुण संकटाला घाबरत नाही, तर त्याच्याशी दोन हात करतो. हीच भावना ‘संकासूर’ मध्ये आहे. या संपूर्ण टीमला माझ्या मनापासून शुभेच्छा.”

दिग्दर्शक गणेश सीताराम माळी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “‘संकासूर’ हे फक्त नाव नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यातील देव आहे. आम्ही ही कहाणी मातीच्या गंधातून मांडली आहे. पणदेरी पंचक्रोशी व मंडणगड तालुक्यातील ग्रामस्थ व महिलांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हे स्वप्न सत्यात उतरले आहे. त्यांचे नटखट प्रोडक्शन च्या वतीने आभार मानतो.
नटखट प्रोडक्शन च्या संपूर्ण टीमने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपार मेहनत घेतली.या सोहळ्याला अनेक मान्यवर, कलाकार, तंत्रज्ञ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री सुनिल आईनकर यांनी केले..सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले शुभम किजबिले यांनी कार्यक्रमात उत्तम रंगत आणली.लवकरच ‘संकासूर’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.