भाजपच्या चिपळूण ग्रामीण, ग्रामीण पश्चिम आणि शहर मंडल प्रभारीपदी नव्या नियुक्त्या

 सौ. स्वप्ना यादव, बळीराम मोरे आणि मधुकर निमकर यांच्यावर पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी
 कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

चिपळूण, संतोष सावर्डेकर :
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने चिपळूण तालुक्यात महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजपच्या चिपळूण ग्रामीण मंडल प्रभारीपदी सौ. स्वप्ना यादव, चिपळूण ग्रामीण पश्चिम मंडल प्रभारीपदी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, तर चिपळूण शहर मंडल प्रभारीपदी मधुकर निमकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे चिपळूण शहरासह ग्रामीण भागातील पक्ष संघटनेच्या कामाला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या तिन्ही नियुक्त्यांनंतर चिपळूण शहर आणि तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि समर्थकांकडून नवनियुक्त मंडल प्रभारींचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पक्षाने सोपविलेल्या नव्या जबाबदारीबद्दल स्वप्ना यादव, बळीराम मोरे आणि मधुकर निमकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या निमित्ताने भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या खेर्डी येथील स्वामिनी निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी नवनियुक्त मंडल प्रभारींचे अभिनंदन करून त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीत एकजुटीने काम करण्याचा निर्धारही व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यात मंडल प्रभारींची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. स्थानिक पातळीवर पक्षाची ध्येयधोरणे पोहोचविणे, बूथ स्तरावरील संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी समन्वय राखणे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच आगामी राजकीय आणि संघटनात्मक कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन करणे, अशा विविध जबाबदाऱ्या या पदांच्या माध्यमातून पार पाडाव्या लागतात. नवनियुक्त प्रभारींच्या अनुभवाचा आणि संघटनात्मक कौशल्याचा उपयोग करून चिपळूण शहरासह ग्रामीण व ग्रामीण पश्चिम भागात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. या नियुक्त्यांच्या निमित्ताने चिपळूण भाजपमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी या तिन्ही प्रभारींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी चिपळूण ग्रामीण मंडल प्रभारी सौ. स्वप्ना यादव, चिपळूण ग्रामीण पश्चिम मंडल प्रभारी तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, चिपळूण शहर मंडल प्रभारी मधुकर निमकर, चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण, भाजप गटनेते शशिकांत मोदी, नगरसेविकास सौ. वैशाली निमकर, सौ. अंजली कदम, सौ. रसिका देवळेकर, शितल रानडे, नगरसेवक शुभम पिसे, जिल्हा उपाध्यक्षा ॲड. नयना पवार, भाजप चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू, महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. रुही खेडेकर, सौ. स्वाती देवळेकर, सौ. तेजस्वी किंजळकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. दीप्ती महाडिक, चिपळूण पंचायत समिती सदस्य सौ. सुप्रिया देवरुखकर, सौ. सायली वाजे, भाजपा महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्ष सौ. आदिती गुडेकर, समीर टाकळे, संदीप सुखदरे, दीपक महाडिक, रत्नदीप देवळेकर, संदेश किंजळकर, महेश कांबळी, राकेश दाते, सुनील वाजे, जतीन घटे आदी उपस्थित होते.