खेड (प्रतिनिधी) : खेड तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी गुणदे गावचे माजी सरपंच व तरूण तडफदार नेते संजय अनुसया दत्ताजीराव आंब्रे यांची निवड करण्यात आली आहे. खेड तालुका सेवा संघाची नुकतीच खेड येथे बैठक झाली, त्यावेळी ही निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजयकदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शरद शिर्के, विश्वास शिंदे, विजय कदम, यशवंत कदम, सखाराम कदम (भावोजी), विष्णुपंत आंब्रे, श्री. विचारे, दीपक आंब्रे, संदीप आंब्रे, चंद्रकांत उर्फ बावा आंब्रे, ॲड. आनंद भोसले, सतीशजी चिकणे, श्री. गुजर, पप्पी आंब्रे, ॲड. राजेश जाधव, राहुल सावंत, प्रभाकर पालांडे, विलास कदम गुरुजी आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल नुतन अध्यक्ष संजय आंब्रे यांचे खेड तालुका तसेच सातगाव आंब्रे आणि आवाशी-गुणदे पंचक्रोशीतून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.












