गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर उपसभापती निलेश सुर्वे यांची विशेष उपस्थिती
गुहागर प्रतिनिधी : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत गुहागर तालुक्यातील सखी महिला बचत गट प्रभाग संघाने निर्माण केलेल्या कृषी अवजारे बँकेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सन्माननीय महेश जी नाटेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी गुहागर तालुका पंचायत समितीचे सभापती सन्माननीय प्रणव जी कोळेकर उपसभापती निलेशजी सुर्वे यांची विशेष उपस्थिती होती उमेदच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम व त्यातून रोजगार निर्मिती व यामधून महिला सक्षमीकरण व स बळी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे याचाच एक भाग म्हणून गुहागर तालुक्यातील पडवे प्रभागाच्या सखी प्रवाह संघाने कृषी अवजारे बँकेची निर्मिती केली आहे
यामध्ये भूमि ग्राम संघ गोळेवाडी यांनी पावर टिलर इलेक्ट्रिक पंप ग्रास कटर लाकूड कटर फवारणी पंप राईस मिल समता ग्रामसंग पावसाळा हिर काढणे मशीन भावना ग्राम संघ भादगाव ग्रास कटर दिशा ग्राम संघा विरंगणा ग्रामसंग पाचेरी आगर पावर टिलर सावित्री ग्रामसंग जांभारी कुंडली ग्रास कटर कटर मशीन प्रेरणा ग्राम संघ शिवणे कोकम मशीन जागृती ग्राम संघ कुंडली पेट्रोल पंप ग्रास कटर फवारणी पाईप हॉर्नी पंप अशा अवजारातून या सखी प्रभाग संघाने कृषी अवजारे बँक निर्माण केले आहे या बँकेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सन्माननीय महेश जी नाटेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले सखी प्रभाग संघाने निर्माण केलेल्या या आगळ्यावेगळ्या आणि रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी अवजारे बँकेबद्दल नाटेकर कोळेकर सुर्वे यांनी या प्रभाग संघातील महिला भगिनींचे अभिनंदन केले आणि त्याचबरोबर या बँकेची आज निर्मिती केली असली तरीही बँक चांगल्या पद्धतीने चालवून बचत गटातील ग्राम संघातील महिलांना यातून रोजगार कसा मिळेल याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे सांगतानाच ही अवजारे चालवण्यासाठी या बचत गटातील महिला भगिनींनी कौशल्य अंगी कारले पाहिजे अशी भावना व्यक्त केली त्याचबरोबर या प्रभाग संघातील महिला बचत गट सदस्यांना यापुढे जी आवश्यक मदत लागेल ती आवश्यक मदत जिल्हा परिषद व पंचायत समिती मधून आपण करणार असून या उमेद अभियानाचा आपल्या सर्वांगीण विकासासाठी सर्व महिला भगिनींनी उपयोग करून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले . अबोली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री ऋषिकेश बाईक यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या या प्रभाग संघाच्या कार्यक्रमा वेळी गुहागर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय मोहिते, मायको कंपोस्ट पुणे चे कौस्तुभ येद्रे, विनोद सुर्वे,आबलोली सरपंच वैष्णवी नेटके, प्रभाग संघाच्या अध्यक्ष नाजिमा दाभोळकर, सचिव सुनिता शेट्ये ,प्रभाग संघ समन्वय रूपाली पवार, सुनिधी मोहिते,विद्या धनावडे, स्मिता शिलधनकर,भक्ती साळवी, सिमरन नाचरे, रेखा जाधव, सुचिता कटनाक, निर्जला तटकरे,आकांक्षा जाधव, विशाखा नाटुस्कर, वेदिका पालशेतकर, मनस्वी मोहिते, सुदिक्षा डींगणकर, सुप्रिया हुमणे, चैतनी शेटे, मीनल कदम, आसावरी आलीम, प्रकृती करमरकर, वैदेही माटल आदीसह सर्व ग्राम संघ पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












